Maha Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोर्टाची मोठी टिप्पणी, शिवसेनेकडून जोरदार युक्तीवाद
Maha Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोर्टाची मोठी टिप्पणी, शिवसेनेकडून जोरदार युक्तीवाद image source नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणाचा युक्तिवाद लाईव्ह पाहता येणार आहे. यावेळी शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. यावेळी, कोर्टाने राजकीय पक्षाची व्याखा काय आहे, अशी विचारणाच केली. गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज घटनापीठापुढे सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठामध्ये होत आहे. यावेळी शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. कौल: राजकीय पक्षाच्या सदस्याच्या अपात्रतेचा निवडणूक आयोगासमोर असलेल्या निवडणूक चिन्हाच्या कार्यवाहीश...